मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि “अक्षरा केंद्र” या स्वयंसेवी संस्थेने मिळून सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळाच्या विरोधात जनजागृती मोहीम सुरु केलेल्या माहिती शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. मात्र या मोहिमेस देण्यात आलेल्या ‘जगह दिखाओ’ या नावावरून मराठी भाषिक जनतेतून नाराजीचे स्वर ऐकू येताना दिसत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे महामंडळाने जनतेशी संवाद साधताना मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. त्यामुळे अभियानाचे माहितीपत्रक मराठीत असून अभियानाचे नाव हिंदीत का असा प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे.
वाचकांचे विचार
संयुक्त महाराष्ट्राची निर्मित एक भाषिक राज्य म्हणून झालेली असून मराठी भाषिक एकमेव राज्य आहे. राज्य परिवहन मंडळाची सेवा बहुतांश मराठी भाषिकांकडून वापरली जात असल्यामुळे व महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महामंडळाचे कामकाज संपूर्ण कामकाज मराठीतच होणे आवश्यक आहे. तरी, “जगह दिखाओ” अभियानाचे नाव शुद्ध मराठीतच करावे, ही विनंती.
–अक्षय म्हापदी,कळवा
Facebook Comments Box