मसुरे : कठडा नसलेल्या विहिरीत १४ रानटी डुकरे पडून मृत पावल्याची दुर्दैवी घटना मसुरे तीळ मार्गाचीतड येथे घडली आहे. ही घटना आज सकाळी परिसरात दुर्गंधी परसरल्याने उघडकीस आली. या घटनेबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याच विहिरीत त्या मृत डुकरांचे दफन करण्यात आले.
येथील सुषमा परब आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची कठडा नसलेली विहीर येथे बिनवापरात आहे. या परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने येथील स्थानिकांनी नक्की दुर्गंधी कुठून येत आहे याची शोधा शोध सुरु केल्यावर हा प्रकार निदर्शनास आला.
Facebook Comments Box
Related posts:
"राणेंना संपवता संपवता....." नितेश राणे यांच्या शपथविधीनंतर निलेश राणे यांची ती पोस्ट चर्चेत
महाराष्ट्र
संतापजनक: मालवणात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला; शिवप्रेम...
सिंधुदुर्ग
Kudal: साळगाव शाळा क्र.१ च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
सिंधुदुर्ग