सावंतवाडी :सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामाविषयी आणि इतर मागण्यासांठी एक निवेदन सादर केले. सुप्रिया सुळे या सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती.
या निवेदनात एक्स्प्रेस गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा द्यावा तसेच कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या गाड्या तातडीने सुरु कराव्यात, या मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. याचसोबत सावंतवाडी स्टेशनचे फेज १ चे काम पुर्ण होत आले असले तरी फेज २ चे काम अद्याप अपूर्ण आहे. यासाठी आणखी ८.१४ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून हा निधी मंजूर करणे, सावंतवाडी ते वसई आणि सावंतवाडी ते पुणे या मार्गावर दोन नव्या गाड्या सुरु कराव्यात या आणि इतर मागण्यांसाठी संघटनेने दिलेले निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले.
यावेळी सावंतवाडी टर्मिनस संघटनेचे मिहिर मठकर, विहांग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर तर राष्ट्रवादीच्या सौ.अर्चना घारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी त्वरित या मागण्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना या मागण्यांचा प्राधान्याने सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा असे अशी विनंती केली आहे.
Facebook Comments Box