मुंबई गोवा महामार्गावर उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई; गोवन दारूसह तब्ब्ल १ कोटीचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी: मुंबई – गोवा महामार्गावर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली येथे उत्पादन शुल्क पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना दहाचाकी बंद बाँडीचे वाहनासह (सुमारे ऐक कोटी,दोन लाख आठ हजार) अं. 1,02,08,000/- रु. किमतीचा गोवा बनावटी दारूसह मुद्देमाल आज 30 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी पहाटेच्या वेळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास जप्त केला आहे.यात पकडलेल्या दारू सुमारे ७२ लाख किमतीची असून त्यासाठी वापरलेला बंद कंटेनर हा जवळपास ३० लाख किमतीचा आहे.

सदरील मिशन हे फत्ते करण्यासाठी श्री. विजय सूर्यवंशी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क. कोल्हापूर विभाग कोल्हापूर, मा. श्री. वैभव वैद्य, साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29/10/2023 रोजी रात्री 09 च्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना आज दिनांक 30/10/2023 रोजी पहाटे 5 च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारे दहाचाकी बंद बाँडीचे वाहन क्र. NL- 01/AG-9252 या वाहनाची तपासणी केली असता सदर दहाचाकी बंदबॉडीचे वाहनास पाठीमागील दोन्ही बंद दरवाज्यांना बॉटल सील लावलेले दिसून आले.

वाहन चालकाने त्या वाहनामध्ये मशिनरी स्क्रॅप भरलेले असल्याचे सांगितले. वाहनचालकाने दिलेल्या ट्रान्सपोर्ट बिल्टी नुसार संशय आल्याने त्याच्याजवळ अधिक विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे वाहन क्र. NL-01/AG-9252 या वाहनाच्या मागील दरवाज्यावर लावलेले बॉटल सील तोडून दरवाजा उघडून पाहिले असता सदर वाहनामध्ये ड्रीम्स डिस्टीलरीज गोवा निर्मित गोवा बनावटीच विदेशी मद्याचे रॉयल ग्रेन्ड माल्ट व्हिस्कीच्या 180 मि.ली एकुण 1000 कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स (48000 बाटल्या मिळून आले. सदर प्रकरणी जगदीश देवाराम बिश्नोई, रा. भाटीप, पोस्ट पमाना, ता. रानिवाडा, जि. जालोर, राजस्थान पिन-343040 सध्या रा. 22/5, हेमकुंज सोसायटी, मातावाडी. एलएच रोड, सुरत गुजरात – 395006 यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं. रु. 72,00,000/- किंमतीचे मद्य तसेच रु.30,00,000/- किमतीचे चारचाकी वाहन, एक मोबाईल रु. 8000/- किंमतीचा असा एकुण अं. रु.1.02.08,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर कारवाई मा. श्री. वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, श्री. तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री. गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री. दिपक वायदंडे, श्री. प्रसाद माळी जवान व श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली.सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. प्रदीप रास्कर हे करीत आहेत.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search