Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील अतिजलद आणि आरामशीर प्रवासासाठी ओळखली जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत काहीसा बदल केला जाणार आहे. या गाडीच्या डब्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. सेकंड स्लीपरचे अजून ४ डबे या गाडीला जोडले जाणार आहेत, त्यामुळे या गाडीच्या सेकंड स्लीपर डब्यांची संख्या ४ वरून ८ इतकी होणार आहे. हा बदल दिनांक ०२ मार्च २०२४ पासून अमलांत आणला जाणार आहे.
सध्याची स्थिती – १६ एलएचबी कोच
१ फर्स्ट एसी
२ एसी टू टियर
६ एसी थ्री टियर
४ स्लीपर
१ एसी पँट्री कार
1 गार्ड ब्रेक व्हॅन
1 पॉवर कार
सुधारित स्थिती – २० एलएचबी कोच
१ फर्स्ट एसी
२ एसी टू टियर
६ एसी थ्री टियर
८ स्लीपर क्लास
१ एसी पँट्री कार
१ गार्ड ब्रेक व्हॅन
१ पॉवर कार
Facebook Comments Box