Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, किमती वस्तू बरोबर घेऊन प्रवास करणे आता मोठे जिकिरीचे झाले आहे.. कोचिवली-चंदीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने ५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी सव्वासहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाईन कुन्नेल दिवाकरण (वय ४९, रा. सुरत, गुजरात) हे संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. ते झोपेत असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील ४ लाख ७७ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ३३ हजारचे डायमंड इअररिंग, २ हजार ६०० रुपयांचे चांदीचे दागिने, ३० हजारांची पाच घड्याळे, ४ हजार ५०० रुपये रोख व कागदपत्रे असा सुमारे ५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी दिवाकरण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस अमलदार करत आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad