Mumbai : मध्य रेल्वेने महिला प्रवाशांसाठी सुविधेकरिता शुक्रवारी मुलुंड स्थानकावर वुलू WOLOO महिला पावडर रूमचे उद्घाटन केले. मुलुंड येथील पावडर रूम हे केवळ स्वच्छतागृह नसून सुविधा आणि लक्झरी यांचे एक चांगले उदाहरण आहे असल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.
पावडर रूममध्ये कोणत्या सुविधा आहेत ?
वाय-फाय, मध्यवर्ती वातानुकूलित अंतर्गत भाग आणि वर्धित सुरक्षिततेसाठी प्रवेश नियंत्रण सॉफ्टवेअरसह सुसज्ज,स्वच्छ स्वच्छतागृह तसेच आनंददायी वातावरण या पावडर रूम मध्ये असणार आहेत. तसेच येथे महिला-केंद्रित उत्पादनांचा साठा असलेले किरकोळ स्टोअर देखील आहे.
या पावडर रूमच्या एकवेळ वापर करण्यासाठी 10 रुपये प्रति व्यक्ती आकारण्यात येणार असून याचे वार्षिक सबस्क्रिप्शन सुद्धा उपलब्ध आहे. मात्र ३६५ रुपये भरून ही पावडर रूम वर्षभरासाठी वापरू शकता. वार्षिक सुसंबक्रिप्टिव घेतल्यास ही पावडर रूम वापरण्यासाठी प्रतिदिवस मात्र एक रुपया एवढे चार्जेस द्यावे लागणार आहे.
मुंबई विभागातील सहा अतिरिक्त स्थानकांवर देखील अशा पावडर रूमची स्थापना करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे. एलटीटी, घाटकोपर, कांजूरमार्ग, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर या स्थानकांवर हे पावडर रूम लेकराचं बांधले जाणार आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad