मालवण: कोकणातील मच्छीमार व्यावसायिकांना लवकरच अर्थाजनाचा एका चांगला स्रोत मिळणार आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या धर्तीवर प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत कोकणातील किनार पट्ट्यांवर मच्छीमारांना शेवाळी शेती करता येणार आहेत.
आचरा येथील जामडूल खाडीत या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात होत आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छीमारांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे .यासाठी मच्छीमारांना समुद्र शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे दाभोळ भीव बंदर येथे या प्रकारचे प्रशिक्षण मच्छीमारांना देण्यात आले आहे त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या मच्छीमार शेतकऱ्यांनी तो प्रकल्प सुरू केला आहे .आचरा येथे जामडूल खाडपात्रात या प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली आहे. याचा शुभारंभ बुधवारी आचरा सरपंच जेरॉन फर्नाडिस यांच्या हस्ते झाला. यावेळी गुजरात येथील सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे,ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम,आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विवेक ताम्हणकर, प्रमोद वाडेकर,अर्जुन बापर्डेकर,सौ प्रतिक्षा वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
समुद्र शेवाळाला जगभरातून औषध उत्पादक कंपन्यांकडून मागणी आहे सौंदर्यप्रसाधन विविध औषधे तसेच याच्या पासून बनवलेल्या लिक्विड खताला सेंद्रिय शेतीत महत्वाचे स्थान आहे.यामुळे याला खूप मागणी आहे. खारया पाण्यातील या शेतीमुळे मच्छीमारांना अर्थार्जनाचे एक नवीन दालन खुले होणार आहे.
असा हा प्रकल्प महाराष्ट्र फिशरी डिपार्टमेंट मार्फत महाराष्ट्रात आलेला आहे अशी माहिती मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या गुजरात येथील सेंट्रल साल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे यांनी दिली आहे या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही माशांना ते खाद्य म्हणून खूप उपयुक्त ठरते त्यामुळे माशांची पैदासही वाढते आणि मच्छीमारांचा फायदा होतो अतिशय अकुशल असणाऱ्या लोकांना या व्यवसाय करता येतो या प्रकल्पासाठी महिलांचा सहभाग फारच उपयुक्त ठरतो आणि महिलांच्या हाताला काम मिळते.
समुद्र शेवाळ्याची शेती करताना बीज समुद्रात टाकले की 30 किंवा 45 दिवसांमध्ये ती शेती तयार होते हे उत्पादन विकत घेण्याकरता उद्योजक ,मोठ्या कंपन्यांना बोलावले जाते आणि हे उद्योजक हे शेवाळ विकत घेतात यातून मच्छीमारांना चांगला आर्थिक फायदा होतो .अतिशय उपयुक्त अशा या प्रकल्पाचा जिल्ह्यात आचरा येथे प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ झाला आहे .तामिळनाडू गुजरात या ठिकाणी हे प्रकल्प यशस्वी ठरले आहेत. याबाबत माहिती देताना मोनिका कवळे यांनी सांगितले की प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत हा प्रोजेक्ट सुरु केला जात असून पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत दहा जागा शोधून शेवाळ शेती करायची आहे. सध्या महाराष्ट्रात रत्नागिरी दाभोळ भीव येथे, देवगड आणि मालवण तालुक्यातील आचरा येथे ही शेवाळ शेती केली जाणार आहे. शेवाळपासून केरीटीन आणि आगार आगार अशी दोन केमिकल्स मिळतात.यांचा वापर खाद्य,सौंदर्य, फार्माक्यूटीकल इंडस्ट्रीज मध्ये केला जात आहे. या शेवाळाची लागवड तीन प्रकारे केली जाते तामिळनाडू भागात पाणी शांत असल्याने बांबू तराफा पद्धतीने लागवड केली जाते. पण आपल्या कडे महाराष्ट्रात पाणी उथळ असल्याने यथे प्लोटीन मोनोलाईन पद्धतीने शेवाळ शेती केली जात आहे. आचरे मध्ये पण याच पद्धतीने शेती केली जात आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad