सावंतवाडी, ता. ९ : सावंतवाडीतील अवघी तीन वर्षांची चिमुरडी ‘नृत्या’ सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. निमोनियाच्या गंभीर प्रकारामुळे तिला कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचारासाठी तब्बल १० ते १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे.
‘नृत्या’ ही सावंतवाडीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर महेश जांभोरे यांची कन्या आहे. जन्मापासूनच विविध आरोग्य समस्यांशी ती लढत आहे. आतापर्यंत जांभोरे यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च करून मुलीवर उपचार सुरू ठेवले, मात्र सध्याच्या परिस्थितीत उपचारांचा खर्च परवडणं कठीण झालं आहे.
आठवडाभरापूर्वी ताप व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमधून तिला कोल्हापूर येथे हलविण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
त्यासाठी प्रवीण कुबल (7066415169) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दात्यांना आर्थिक मदत द्यायची असेल त्यांनी या बँक अकाउंटवर IFSC :- SBIN0000476, Account no :- 20300618631 किंवा गुगल पे महेश जांभोरे (9545472152) वर आपली मदत पाठवावी.
नृत्याच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन तिच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.


