Mumbai : राज्य सरकारने गुरुवारी बहुचर्चित देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर (MTHL) वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या टोल रकमेची निश्चिती केली आहे.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत. ठाणे खाडीवरील शिवडी (Shivdi) ते नवी मुंबई (New Mumbai) या 22 किमी लांबीच्या पुलाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष).
या महामार्गाच्या टोलच्या दरांवरून समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिकिया मिळत आहे. काहींच्या मते सरकारने टोल चे दर कमी करावेत. मात्र काहींच्या मते या महामार्गामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे त्यामुळे हे दर रास्त आहेत.
Facebook Comments Box
Related posts:
चिपळूण: तिसर्या लुप लाइनच्या कामासाठी कोकण रेल्वेचा उद्या ब्लॉक; दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार...
कोकण
तळकोकणातील ती २५ गावे "पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशीलच"....अधिसूचना काढण्यासाठी उच्च न्यायालयाचा सरकार...
कोकण
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ
कोकण