Mumbai Transharbour Link Road :देशाचे पंत्रपधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उदघाटन होणाऱ्या देशातील सर्वात लांब समुद्री महामार्ग अशा ‘मुंबई ट्रान्सहार्बर लिंक ’ अर्थात अटल बिहारी वाजपेयी सेवरी न्हावा शेवा अटल सेतूवर कमाल १०० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा राहणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार चार चाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा १०० किलोमीटर प्रतितास राहणार आहे. तर पुलाच्या सुरवातीला चढणीला आणि शेवटी उतरताना ताशी 40 किलोमीटरपर्यंत मर्यादित असेल. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी या महामार्गावर प्रवेश असणार नाही.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष).

Facebook Comments Box
Related posts:
कोकण रेल्वे मार्गावरील ही नियमित गाडी आता LHB स्वरुपात धावणार; डब्यांच्या संरचनेत मोठा बदल
कोकण
Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी ...
कोकण
Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावर अडकलेल्या गाडय़ा मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात ...
कोकण