सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी अ अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे.
संघटनेमार्फत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत
१) सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करून त्याला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
२) कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे
३)ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.
४)सावंतवाडी स्थानकावर प्रवासी सुविधांचा विस्तार करणे(पूर्णवेळ PRS,अमृत भारत स्थानक योजना,एक स्थानक एक उत्पाद, आदी.
५) प्रा. मधु दंडवते यांचा प्रत्येक स्थानकावर तैल चित्र लावणे.
६)चिपळूण – कराड, वैभववाडी – कोल्हापूर, सावंतवाडी – बेळगाव या रेल्वे मार्गांना चालना देणे.
७)सावंतवाडी स्थानकावर मंगलोर, मंगला सहित अतिरिक्त सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे.
८. याच बरोबर पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी बांद्रा – वसई – सावंतवाडी नवीन एक्सप्रेस किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून पुणे – कल्याण – सावंतवाडी एक्सप्रेस तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी एक्सप्रेस सुरू करावी.
९. येथील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात व न्याय मिळावा.
सामाजिक आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा
या उपोषणास कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह एकूण २३ संस्था एकत्र आल्या आहेत. सिंधुदुर्ग प्रतिष्ठान-मुंबई, संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था-मुंबई, पागवाडी मुळीक प्रतिष्ठान- इन्सुली सिंधुदुर्ग, घे भरारी फाऊंडेशन-चर्चगेट, जनजागृती सेवा संस्था-ठाणे , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना-सावंतवाडी, मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाऊंडेशन- सावंतवाडी इत्यादी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांनी आपले समर्थन दिले आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
ईमेल अभियान
आपल्या रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेतर्फे ‘ई-मेल करा’ अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी,न्यायासाठी सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे जेणेकरून आम्हा कोकणवासियांना हक्काच्या गाड्या मिळतील यासाठी रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी खाली लिंकवर ई-मेल चा मायना दिला आहे त्यात स्व:ताचे नाव व मोबाईल नंबर टाकुन आपल्या ईमेल ने सन्माननीय पंतप्रधान तसेच रेल्वे मंत्री, रेल्वेराज्यमंत्री, रेल्वे बोर्ड व कोकण रेल्वेचा व्यवस्थापकीय संचालक यांना आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad