नवी दिल्ली: ज्ञानवापी मशीद संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) रिपोर्ट आला आहे. या अहवालातून ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिरच होते. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर असल्याचे 32 पेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. 32 शिलालेखमधून हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अहवाल दोन्ही पक्षांना एएसआयने दिला आहे. मशीद बांधताना हिंदू मंदिरातील खंबे थोड्याप्रमाणात बदलण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालातील काही माहिती पुढे आली आहे.
नेमके काय आहे रिपोर्टमध्ये
ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा केंद्रीय कक्ष होता. तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागात एक एक खोली होती. त्यातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातील अवशेष मिळाले. परंतु पूर्व विभागाचे अवशेष अजून मिळाले नाही. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होते ते आता मशिदीचे केंद्रीय कक्ष आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होता. हे प्रवेशद्वार दगडांनी बंद करण्यात आला आहे. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
- मशिदीच्या आधी, तिथे बांधलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती कक्ष होता आणि उत्तर बाजूला एक लहान खोली होती.
- मध्यवर्ती कक्ष आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या संरचनेचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
- मशिदीची पश्चिमेकडील खोली आणि पश्चिमेकडील भिंत आहे.
- मशिदीच्या बांधकामादरम्यान, मंदिराच्या खांबांमध्ये तसेच इतर भागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले. ज्यामुळे त्याला मशिदीचा आकार देण्यात आला.
- विद्यमान संरचनेवर शिलालेख दिसून आले.
- दगडांवर अरबी आणि पर्शियन शिलालेख आहे.
- तळघरात शिल्पाचे अवशेष आहेत.
- शिलालेखामध्ये देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी 32 शिलालेख सापडले. त्यात देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी मिळाली आहे. त्यावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे देवांचे नाव मिळाले. महा-मुक्तिमंडप यासारखे तीन शब्द शिलालेखांमध्ये मिळाले आहे. मंदिराचे अनेक शिलालेख मशीद बनवताना वापरल्याचे अहवालात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे येथे शिवलिंग, हनुमान आणि गणेशजी च्या मुर्त्या आढळून आलेल्या असल्याने येथे मंदिरच असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.



Facebook Comments Box