सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. बांदा, वेंगुर्ला, शिरोडा, रेडी पासून आंबोली चौकुळ अशा विस्तारित क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे सोयीचे स्थानक आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही हे कोकण रेल्वे च्या पूर्ण मार्गातील पाहिल्या दहा स्थानकांत मोडते. असे असूनही येथे खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संघटनांनी वेळोवेळी मागणी करूनही अजूनही काही मुख्य गाड्यांना थांबे मिळाले नाही आहेत. त्यात भर म्हणजे आता विशेष गाड्यांच्या थांब्यांसाठी सावंतवाडी स्थानकाला वगळण्यात येत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आताच जाहीर करण्यात आलेल्या अयोध्ये यात्री साठी चालविण्यात येणार्या ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला नाही आहे. त्यामुळे सावंतवाडीत रामभक्त नाहीत का? असा सवाल प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचाराला जात आहे. रेल्वे अभ्यासक आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे श्र. सागर तळवडेकर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाडीला सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
विविध मागण्यांसाठी सावंतवाडी येथे आज लाक्षणिक उपोषण.
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे.
Vision Abroad