सावंतवाडी दि. २७: विविध मागण्यांसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने काल झालेलया लाक्षणिक उपोषणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक तसेच मुंबईहून चाकरमानी पण मोठ्या संख्येत आले होते. हजारो नागरिकांनी उपोषणास उपस्थिती दर्शविली.
कोकण रेल्वे कडून समाधानकारक उत्तरे नाहीत
दरम्यान, कोंकण रेलवे कॉपर्पोरेशन लि. रत्नागिरीचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रविंद्र कांबळे यांच पत्र घेऊन कोकण रेल्वेचे कणकवली येथील अधिकारी घनश्याम उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी रेल्वे प्रशासनान दिलेलं हे पत्र म्हणजे प्रवाशांची केवळ फसवणूक करण्याचा प्रकार आहे. आमच्या मागण्यांबाबत यात कोणतीही स्पष्टता नाही. यात सूरु असणाऱ्या रेल्वे गाड्यांचीच माहिती आहे. आमच्या इतर मागण्या तुमच्या अधिकारात नाही तर हे पत्र घेऊन तरी का आलात ? रेल्वे प्रशासन आम्हाला मुर्ख समजत का ? असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला.
केंदीय मंत्री नारायण राणे यांचे आश्वासन
माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी भ्रमणध्वनीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद साधून दिला. नारायण राणे यांनी फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवड्यात संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घालून देवून काही प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने उपोषण स्थगित केले.
लाक्षणिक उपोषण की ‘रेल रोको’?
रेल्वे प्रशासनाने या उपोषणाला ‘रेल रोको’ असे नाव देण्याचा कुटील खेळ खेळल्याचा प्रकार घडला. आंदोलनास ‘लाक्षणिक उपोषण’ च्या जागी ‘रेल रोको’ आंदोलन असे नाव दिल्यास नागरिक घाबरून या आंदोलनास उपस्थिती दाखवणार नाही असा या मागे हेतू होता. मात्र रेल्वे प्रशासनाचा हा हेतू साध्य झाला नाही. उलट या उपोषणास अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी जमली होती.
मुळात उपोषणाची माहिती अगोदर एक महिना आगाऊ सूचना देऊन पोलीस खात्याला फक्त उपोषण आहे असे सांगितले होते मात्र कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सुद्धा रेल रोको आणि रस्ता रोको आंदोलन होणार आहे अशी दिशाभूल करणारी माहिती दिली तसेच एवढ्यावरती न थांबता तेच पत्र उपोषण करताना मंडपात आणून दिले आमच्या मागण्या काय होत्या कशा होत्या त्या विकृतपणे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्या मनाने लिहिल्या असा आरोप कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी केला आहे.
आमरण उपोषणचा इशारा
उपोषण स्थगित केले असले तरीही मागण्या मान्य न झाल्यास २३ फेब्रुवारी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष अॅड संदीप निंबाळकर यांनी दिला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, सावंतवाडीकरांच्या हक्काची रेल्वे आहे. यासाठी माजी आमदार जयानंद मठकर, डी.के.सावंत यांसह सावंतवाडीकरांनी योगदान दिलं आहे. आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. त्यामुळे कोकण रेल्वे व सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस उभारणी एका टप्प्याच काम पूर्ण झालेले असताना दुसऱ्या टप्प्याच काम निधी अभावी रखडलं आहे. लोकांची फसवणूक करण्याच काम स्थानिक आमदारांकडून केलं जातं आहे अशी टीका त्यांनी केली. तर रेल्वे रोको पेक्षा जिल्ह्यातील मंत्र्यांची गाड्या रोखा असं विधान माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी केल. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे शांताराम नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, प्रवासी संघटनेचे राजू कांबळे, सुनील उतेकर,कमलताई परूळेकर, युसुफ आर्ते, अँड देवदत्त परूळेकर, रमेश बोंद्रे, अभिमन्यू लोंढे, अँड नकुल पार्सेकर सागर तळवडेकर,सागर नाणोसकर,सिमा मठकर,आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील गावांचे सरपंच यांसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. रेल्वे टर्मिनस पूर्ण झालच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, प्रमुख राजू कांबळे, संजय सावंत, रुपेश दर्गे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, श्वेता शिरोडकर, अण्णा केसरकर, यशवंत जडयार, प्रमोद गावडे,अभिमन्यू लोंढे, शेखर पाडगांवकर, भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, अँड. नकुल पार्सेकर, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, रविंद्र ओगले, प्रमोद गावडे,विहंग गोठोस्कर, देव्या सुर्याजी, वजराठ ग्राम पंचायत सरपंच अन्यण्या पुराणिक, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, दीपेश परब,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नेमळे सरपंच.सौ भैरे,,निरवडे सरपंच.सुहानी गावडे आरोंदा उपसरपंच ,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, गुरू गावकर, श्री तानावडे,किरण मातोंडकर, समीर मातोंडकर, राधा तळवडेकर, सुधीर राऊळ, हिदायतुल्ला खान, निलेश कुडव, स्नेहल जामदार, सुधीर पराडकर, सीमा मठकर, कल्पना बांदेकर, सायली दुभाषी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, बाळा गावडे, सिद्धेश सावंत, विनायक गांवस, राज पवार, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, सुरेश गावडे, गुणाजी गावडे, गुरुप्रसाद गवंडे, समीर वंजारी, रफिक मेमन,मुंबईतून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे शेखर बागवे,बाळ वेळकर,दिपक चव्हाण,सुभाष लाड,श्रीकांत सावंत,अभिषेक अनंत शिंदे,राजाराम कुंडेकर,सुरेंद्र पवार,प्रशिल लाड,अतुल चव्हाण,अशोक देवरूखकर,संदेश लाड,पराग लाड,संजना पालव,मनोज पिंपळकर,रंजन पाळेकर, शेखर पाडगावकर, प्रमोद गावडे, चंद्रकांत कासार,बाळा गावडे,वसंत धुरी, जगन्नाथ पंडित, उदय पारीपत्ते, शांताराम (बाबू) पंडित, शिवराम पंडित आदी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले होते.
Facebook Comments Box
Vision Abroad