Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर दोन महिन्यांसाठी दोन विशेष मेमू गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या आठ डब्यांच्या असून पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाच्या असणार आहेत. दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी ९ असे मिळून एकूण १८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
१) गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – रत्नागिरी विशेष मेमू
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी पनवेल येथून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटून रत्नागिरी येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे : सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
2) गाडी क्रमांक ०११५८ चिपळूण – पनवेल विशेष मेमू
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी चिपळूण येथून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून पनवेल येथे रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीचे थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे.
Facebook Comments Box
Vision Abroad