Konkan Railway News: या वर्षापासून कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेल ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉड हॉटेलला कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाते आणि एक अद्वितीय प्रकारची मूलभूत, परवडणारी निवास व्यवस्था याद्वारे प्रवाशांना दिली जाते. मडगाव रेल्वे स्टेशनच्या इमारतीतच ही सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक अतिथीसाठी एक कॅप्सूल दिली जाते. मूलत: बेडच्या आकाराचे हे पॉड जे दरवाजा किंवा पडद्याने बंद करता येतात.
याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांच्या रेल्वेगाडीला बराच विलंब असणार आहे, त्यांना होऊ शकतो. कमी वेळेत हॉटेल रूम शोधणे बऱ्याचदा प्रवाशांसाठी जिकिरीचे असते. अशावेळी प्रवाशांना या पॉड हॉटेलचा फायदा होऊ शकतो.
या सेवेसाठी तासाला नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. प्रवाशांना साह्य करणे हाच यापाठीमागचा हेतू आहे. तथापि, त्यातून कोकण रेल्वेला महसूलही मिळणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
IMD Alert | राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; 'या' जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा...
महाराष्ट्र
महत्वाचे: मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग उद्यापासून 'या' वेळे दरम्यान तीन दिवस बंद रहाणार
महाराष्ट्र
मोठी बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता उद्यापासून येणार;अनेक महिला अपात्र ठरण...
महाराष्ट्र