रत्नागिरी |कोकणातील शेतकरी आणि बागायतदार माकडांच्या उपद्रवामुळे पुरता हैराण झाला आहे. माकडे इथल्या बागायतीत, शेतात नुसता हैदोस घालत आहेत. नारळांची झाडे असून नसण्यासारखी आहेत. कारण त्याला लागणारे नारळांची फळे परिपक्व होण्याअगोदरच त्याची नासाडी करतात. एवढेच नाही तर संधी मिळेल तशी माकडे घरात घुसून खायच्या वस्तू पळवू लागली आहेत.
माकडामंध्ये दहशत निर्माण जाण्यासाठी कोकणच्या काही बाजारपेठेत कार्बाइड गन विकली जात आहे. या बंदुकीने फक्त मोठा आवाज होतो त्यामुळे माकडामंध्ये दहशत निर्माण होते आणि ती पळून जातात आणि पुन्हा यायला घाबरतात. ही बंदूक पीविसी पाइपांपासून तयार केलेली ही बंदूक २०० ते २५० रुपयांमध्ये विकली जात आहे. या बंदुकीमध्ये कार्बाइड चे एक दोन तुकडे आणि काही थेंब पाणी घालून हलवली जाते. त्यानंतर मागे दिलेले स्पार्क बटण दाबले कि मोठा आवाज येतो. हे कार्बाइड चे तुकडे पुन्हा पुन्हा वापरले जातात त्यामुळे खर्च कमी येतो.
माकडांपासून होणारे नुकसान वाचवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग भारतात या पूर्वी केला गेला आहे. तसेच दिवाळी सणाला फटाक्यांना पर्याय म्हणून याचा वापर केला जातो.
महत्वाची सूचना
कार्बाइड मुळे निर्माण झालेला धूर डोळ्यांना हानिकारक असतो. त्यामुळे दिवाळीसाठी फटाक्यांचा पर्याय म्हणून या बंदुकीला बंदी घालावी अशी मागणी मध्येप्रदेशच्या इंदोर या शहरात जोर धरली होती. तुम्ही ही बंदूक जर घेतली असेल किंवा घेणार असाल तर कार्बाइड चा धूर डोळ्यात जाणार नाही याबाबत काळजी घेतली पाहिजे.लहान मुलांना ही बंदूक अजिबात वापरण्यास दिली जाऊ नये.
Facebook Comments Box