आंबोली दि.२५ फेब्रु; पश्चिम घाटात अजूनही जैविविधता टिकून आहे. तळकोकणात आंबोली – चौकुळ ही गावे जैवविविधतेतेसाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जंगलात अजूनही वन्यप्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत आणि हे प्राणी कित्येकवेळा येथील ग्रामस्थांच्या आणि पर्यटकांच्या नजरेस पडताना दिसतात. असेच काही पर्यटक येथे पर्यटनास आले असता त्यांना येथे काळा बिबट्याचे Black Panther दर्शन झाले. यातील काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटोही काढलेत. फोटोस दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले आले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
येथील जैवविविधतेला धोका
येथील ग्रामस्थांनी जरी येथील जैवविविधतेचे आणि निसर्गाचे रक्षण केले असले तरी बाहेरील लोकांकडून त्याला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे येणारे काही पर्यटक शिकारीच्या हेतूने येत आहेत. गेल्याच आठवड्यात सावंतवाडी शहर आणि बांद्यातून काही युवकांनी येथे येऊन साळींदर ची शिकार केली होती. ग्रामस्थांनी जागरुकपणा दाखवून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरी गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी गैरमार्गाने विकत घेऊन तेथे बांधकामे केली जात आहेत. त्याचा परिमाण येथील निसर्गाला, जैवविविधतेला आणि ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. याविरोधात येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला असून आंदोलनाचा मार्ग अंगिकारला आहे.
Facebook Comments Box