मुंबई दि. २८ फेब्रु.: आज विधानभवनात अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काजू प्रक्रिया उद्योगासंदर्भात तसेच काजू बियांना अनुदान देण्यासंदर्भात आपण भूमिका मांडली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील यावेळी केली.
या सर्व मागण्या आणि सूचनांवर सखोल विचार करून त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पणन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागातील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून या संदर्भात गतिमानतेने कृती करून कोकणातील शेतकऱ्यांचे हित जपेल, असा विश्वास आहे.
या बैठकीला आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, आमदार राजेश पाटील, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
Facebook Comments Box
Vision Abroad