दक्षिण भारतात एक रेल्वे स्थानक आहे. जिथे दररोज 60 हून अधिक तिकिटे खरेदी केली जातात, परंतु प्रवासासाठी कोणीही त्यांचा वापर करत नाही. जर ते प्रवास करत नसतील तर ते तिकीट का घेतात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर मग या प्रश्नाचे उत्तरही खाली वाचूया.
तेलंगणा राज्यात वारंगल जिल्ह्यातील नरसंपेटा मतदारसंघासाठी नेकोंडा रेल्वे स्टेशन हे एकमेव थांबा आहे. परंतु तिरुपती, हैदराबाद, दिल्ली आणि शिर्डी यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना जाणाऱ्या गाड्या तिथे थांबत नाहीत, ज्यामुळे प्रवास करू इच्छिणाऱ्या रहिवाशांना अडचणी येतात. पद्मावती एक्स्प्रेसचा परतीचा प्रवासही रद्द करण्यात आला, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती.
प्रवाशांच्या वारंवार विनंती केल्यामुळे अलीकडेच सिकंदराबाद ते गुंटूर या इंटरसिटी एक्स्प्रेसला नेकोंडा येथे तात्पुरता थांबा देण्यात आला. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी एक अट घातली आहे: तीन महिन्यांसाठी उत्पन्न मिळाल्यासच ते पूर्ण थांबा देतील; अन्यथा, ते ते रद्द करतील.
मग काय? कसाबसा मिळालेला हा थांबा न गमावण्याचा निर्धार असलेले नेकोंडा येथील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्याची त्यांनी ‘नेकोंडा टाउन रेल्वे तिकीट फोरम’ नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला, ज्यामध्ये सुमारे 400 लोक सदस्य म्हणून सामील झाले. त्यांनी रु. 25 हजार रुपये देणगीद्वारे जमा केले. या रकमेतून ते याद्वारे ते नेकोंडा ते खम्मम, सिकंदराबाद आणि इतर ठिकाणी दररोज रेल्वे तिकीट खरेदी करतात मात्र प्रवास करत नाहीत.
स्थानकाला उत्पन्न दाखवण्यासाठी ते असे करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्टेशनवर अधिक गाड्या थांबवण्याच्या दिशेने काम करण्याची त्यांची योजना आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad