वाशी : नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत सध्या बाजारात कर्नाटक हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. हापूस ८० ते १७५ रुपये किलो, बदामी ६० ते १२० रुपये किलो, लालबाग १०० ते १४० रुपये किलो, तोतापुरी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे गेल्या दोन आठवड्यांपासून हापूस विक्रीसाठी येत आहे. या आठवड्यापासून आवक वाढली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचे प्रमाण ६० टक्के आहे. उर्वरित ४० टक्के आंबा रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आहे. आंब्याच्या वर्गवारी, दर्जानुसार दर आकारण्यात येत आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad