Konkan Railway News , ०७/०३/२०२४: यंदा होळी सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर उधना-मंगुळुरु आणि सूरत-करमाळी अशा दोन विशेष गाड्यां चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
1) Train No. 09057 / 09058 Udhna Jn. – Mangaluru Jn. – Udhna Jn. Bi- Weekly Special on Special Fare:
ही गाडी उधना आणि मंगुळुरु या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह चालविण्यात येणार आहे.
Train no. 09057 Udhna Jn. – Mangaluru Jn. Bi-Weekly Special on Special Fare:
दिनांक २०/०३/२०२४(बुधवार) आणि २४/०३/२०२४ (रविवार) या दिवशी ही गाडी उधना या स्थानकावरुन रात्री ०८:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०७:०० वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058 Mangaluru Jn. – Udhna Jn. Bi-Weekly Special on Special Fare
दिनांक २१/०३/२०२४(गुरुवार) आणि २५/०३/२०२४ (सोमवार) या दिवशी ही गाडी मंगुळुरु या स्थानकावरुन रात्री १०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५ वाजता उधना या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, ,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव आणि दक्षिणेकडील स्थानके.
डब्यांची संरचना
एकूण २२ डबे = टू टायर एसी – ०१+ थ्री टायर एसी – ०३ + सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४, एसएलआर – ०२
2) Train no. 09193 / 09194 Surat – Karmali – Surat Special on Special Fare (Weekly) :
ही गाडी सुरत आणि करमाळी या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह चालविण्यात येणार आहे.
Train no. 09193 Surat – Karmali Special on Special Fare (Weekly):
गुरवार दिनांक २१/०३/२०२४ आणि २८/०३/२०२४ या दिवशी ही गाडी सुरत या स्थानकावरुन संध्याकाळी ७:५० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १२:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09194 Karmali – Surat Special on Special Fare (Weekly)
शुक्रवार दिनांक २२/०३/२०२४ आणि २९/०३/२०२४ या दिवशी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन दुपारी ०२:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:४५ वाजता सुरत या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, ,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम,
डब्यांची संरचना
एकूण २२ डबे = टू टायर एसी – ०१+ थ्री टायर एसी – ०३ + सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४, एसएलआर – ०२
आरक्षण
या गाड्यांचे आरक्षण दिनांक ०९/०३/२०२४ या दिवशी तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर गुजरातहून अजून दोन विशेष गाड्या; आरक्षण 'या' तारखेपासून – Kokanai
सविस्तर वृत्त👇🏻 https://t.co/mu0MmDtZRR#konkanrailway #HolispecialTrain pic.twitter.com/IOhFX3novn
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) March 7, 2024
Facebook Comments Box
Vision Abroad