Vande Bharat Sleeper Train: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर गाडीचे उत्पादन सुरू केले आहे. ही गाडी प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करतीलच आणि प्रवाशांना आराम आणि सुविधा देतील .उत्तम बर्थ, सेन्सर-आधारित प्रकाश आणि सुधारित रात्रीची प्रकाशयोजना अशा एकूण १० वैशिष्ट्यांसह ही गाडी राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या मानकांना मागे टाकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी (9 मार्च) बंगळुरूमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटच्या कारबॉडी स्ट्रक्चरचे उद्घाटन केले. हा ट्रेनसेट भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने त्यांच्या बंगळुरू येथील रेल्वे युनिटमध्ये तयार केला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वंदे भारत स्लीपरमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन बर्थच्या दरम्यान योग्य उंची देता यावी यासाठी खास छताची रचना करण्यात आली आहे. वातानुकूलन सुधारले आहे.
याशिवाय ट्रेनमध्ये व्हायरस नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. जी 99.99% व्हायरस नष्ट करेल. ट्रेनमध्ये कोणतेही धक्के, आवाज आणि कंपन होणार नाहीत. कारबॉडी पूर्ण आहे. आता फर्निशिंग करायची आहे, त्यानंतर लवकरच ट्रेन सुरू होईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी 160 किमी असेल
स्लीपर वंदे भारत हे कंसोर्टियम म्हणजेच दोन कंपन्यांनी मिळून बांधले आहे. यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) आणि रशियाच्या TMH समूहाचा समावेश आहे. या संघाने 200 पैकी 120 स्लीपर वंदे भारत चालवण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती. उर्वरित 80 गाड्या टिटागड वॅगन्स आणि भेल यांच्या संघाद्वारे पुरवल्या जातील.
RVNL GM (मेकॅनिकल) आलोक कुमार मिश्रा यांनी ऑगस्ट 2023 मध्ये सांगितले होते की वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी 160 किमी असेल. यात 11 एसी3, चार एसी2 आणि एक एसी1 कोच असे 16 डबे असतील. ते म्हणाले की, कोचची संख्या 20 किंवा 24 पर्यंत वाढवता येऊ शकते.
Facebook Comments Box
Vision Abroad