Loksabha Election 2024 : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मनसे निवडणूक लढवत नसली तरीही ती युतीचा भाग असणार आहे. मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्यात येतील असे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.
मनसे महायुतीत सामील होणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. मनसेला युतीत दोन जागा दिल्या जातील अशी चर्चा होत होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डी मतदारसंघ मनसेला मिळणार असे बोलले जात होते. आता मात्र मनसे या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे समोर आले आहे. परंतु मनसे या निवडणुकीत महायुतीचाच भाग राहणार असून महायुतीच्या उमेदवारांना सर्वोतपरी सहकार्य करणार आहे. या बदल्यात मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Election 2024 Voting Live Updates: राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५% टक्के मतदान; टक्केवारीत महाराष...
महाराष्ट्र
Jalgaon Railway Accident: आगीच्या अफवेने घेतला सात ते आठ जणांचा बळी
महाराष्ट्र
दहावी बारावी परीक्षांना बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी; मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्रालया...
महाराष्ट्र