Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी जूनपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा तब्ब्ल १२०० अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणारी ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या मार्च अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने या गाडीच्या एकूण ५४ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक ०३ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक ०४ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी
उन्हाळी हंगामासाठी मध्यरेल्वेच्या २२ विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार; एकूण १२०० विशेष फेर्या
सविस्तर वृत्त 👉🏻https://t.co/FYd1jgo2KV#konkanrailway #centralrailway pic.twitter.com/EnwTMMjxfH— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) March 24, 2024
Facebook Comments Box
Related posts:
संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या...
कोकण
दिवा स्थानकावर रेल्वेचा ब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावरील या गाडीचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंतच
कोकण
Breaking: कोकणरेल्वे पुन्हा थांबली: वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकांदरम्यान दरड कोसळली
कोकण
Madgaon -Nagpur Express must stop at Murtizapur Station