Konkan Railway News: उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेतून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर एक लांब पल्ल्याची विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण २४ फेऱ्या होणार आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे
01463/01464 एलटीटी-कोचुवेली साप्ताहिक विशेष (एकूण 24फेऱ्या)
01463 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11.04.2024 ते 27.06.2024 पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून संध्याकाळी 4:00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08:45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 साप्ताहिक विशेष 13.04.2024 ते 29.06.2024 पर्यंत दर शनिवारी कोचुवेली येथून दुपारी 4:20 वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09.50 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर, त्रिसूर, कोट्टानम, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जं.
डब्यांची रचना: 1 फर्स्ट एसी, 1 फर्स्ट एसी कम थ्री टियर एसी , 2 टियर एसी , 6 थ्री टियर एसी, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 जनरल सेकंड क्लास डबे.
आरक्षण: उन्हाळी विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 08.04.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल अशी मध्य रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad