माणगाव दि. ०७ एप्रिल: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही बसचा आज भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक वृत्तानुसार, ठाण्याहून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावजवळ आली असता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेत रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मानगाव येथील मानस हॉटेलजवळ हा अपघात झाला.
दत्तात्रय वरांडेकर, प्रवीण मालसुरे आणि अन्य एक प्रवासी अशी रिक्षात प्रवास करताना झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस सध्या अपघाताच्या घटनास्थळाचा तपास करत आहेत. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाल्यामुळे धडकेची तीव्रता स्पष्ट होत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपस करत आहेत.
Facebook Comments Box