Konkan Tourism:भारतामध्ये असे अनेक समुद्रकिनारे आहेत जिथे तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता, जिथे बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनच्या उपस्थितीमुळे समुद्र अंधारात चमकताना दिसतो. भारतामध्ये असे चमकणारे एकूण पाच समुद्र किनारे आहेत. कोकण पर्यटनासाठी गौरवाची बाब म्हणजे सिंधुदुर्गातील मालवणचा समुद्र किनारा या चमकणाऱ्या समुद्र किनाऱ्यामध्ये येतो.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा सुंदर सूर्यास्त आणि बायोल्युमिनेसेंट पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर निळ्या-हिरव्या रंगात चमकानारा समुद्र पाहण्यासाठी अनेकजण रात्री बोटीतून सफर करतात. तुम्ही जर उन्हाळी पर्यटनासाठी कोकणात जाण्याची योजना आखात असाल तर रात्री नक्की या समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन निसर्गाच्या या रूपाचा अनुभव घ्या.
रात्रीच्या वेळेस चमकणाऱ्या या समुद्र किनाऱ्यांमागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्याला बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन म्हणतात. समुद्रात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो. समुद्रात डाईनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकतात. भारतात अशा पाच समुद्र किनारे आहेत जिथे पाणी चमकताना दिसते. अंदमान आणि निकोबार येथील राधानगरी बीच, केरळ मधील वर्कला बीच, गोव्यातील पालोलेम बीच, पश्चिम बंगाल येथील मंदारमणी बीच आणि मालवण येथील बीच अशा समुद्रकिनाऱ्यांचा या मध्ये समावेश होतो.
Representative Image (Google)
Facebook Comments Box
Vision Abroad