रत्नागिरी, दि. १४ एप्रिल :रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत नागपूरला रवाना झाले आहेत. नागपूरला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मंतरसंघाच्या आगामी निवडणुकीच्या उमेदवाराचा तिढा अजून सुटला नाही आहे. मात्र भाजप तर्फे नारायण राणे यांनी आपल्या नावाने प्रचार करण्यास सुरवात केलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी चार उमेदवारी अर्ज खरेदी केले असल्याचीही चर्चा होत आहे. याच पार्श्ववभूमीवर किरण सामंत हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला निघाले आहेत.
भाजप या मतदारसंघावर आपला दावा सोडायला तयार दिसत नाही आहे. तर शिवसेना शिंदे गट सुद्धा पण येथे आपला दावा सांगत आहि. तिसरी शक्यता अशीही वर्तविण्यात येत आहे कि किरण सामंत यांना कदाचित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी सांगितले जाऊ शकते. काहीही असो महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांना होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad