सावंतवाडी, दि. १४ एप्रिल : सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या क्षेत्राला ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ क्षेत्र Eco Sensitive Zone ESZ जाहीर करण्यात यावे असेच आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा हा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र गेल्या ११ वर्षात या आदेशांचे पालन झाले नसल्याने केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरल्याचे म्हणत न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
आता मात्र उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने पुढील दोन महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
अधिसूचना काढण्यासाठी ११ वर्षांचा विलंब करण्यात आला, हे दुर्दैव असल्याची माहिती न्यायालयाने दिली. हा भाग पर्यावरणीयदृष्टीने अत्यंत संवेदनशील असूनही येथे दोन वर्षांत ६३९.६२ हेक्टर जमिनीवर जंगलतोड झाल्याने ही चिंतेची बाब आहे. भविष्यात हा प्रकार असाच सुरू राहिला तर माणसांचा वावर वाढून कॉरिडॉर नष्ट होईल, असे निरीक्षण न्या. नितीन जामदार व न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने नोंदविले.
या भागातील जंगलतोडीवर न्यायालयाने २०१३ मध्ये स्थगिती दिली होती. केंद्र सरकार अंतिम अधिसूचना काढेपर्यंत ही स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. झाडे तोडण्यास आळा बसावा यासाठी न्यायालयाने सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश सावंतवाडीचे जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक सावंतवाडी आणि सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने महत्वपूर्ण नोंदी दिल्या यामध्ये, सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉरदरम्यान २५ गावे आहेत. या मार्गात मोठ्या प्रमाणात जंगल भाग असल्याने वन्यप्राण्याचा नेहमी राबता असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. या भागात दुर्मीळ वनस्पतींसह किटकांच्या विविध प्रजाती आहेत.
ती २५ गावे कोणती?
कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील एकूण ३३ गावांचा समावेश इको सेन्सेटिव्ह झोन ESZ मध्ये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सिंधदुर्गतील केसरी, फणसवडे , उडेली, दाभील- नेवली, सरंबळे, ओटावणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंब्रल, पांतुर्ली, भिके कोनाळ, कळणे, उगडे, पडवे माजगाव ही २५ गावे या कॉरिडॉर मध्ये मोडतात.
Facebook Comments Box
Related posts:
कोकण रेल्वे बेळगावला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू; बेळगाव,चंदगड,आंबोलीसह एकूण 9 स्थानकांची निश्चिती
महाराष्ट्र
Konkan Railway | लांब पल्ल्याच्या गाड्यांचा 'सुपरफास्ट' दर्जा राखून ठेवण्यासाठी वाढीव थांबे देण्यास ...
कोकण
मडगाव जं.-वांद्रे(टी) द्वि-साप्ताहिक सेवेची पहिली गाडी मडगाववरून मुंबईच्या दिशेने रवाना; मान्यवरांची...
कोकण रेल्वे
Vision Abroad