Konkan Tourism: मालदीव, थायलंड सारखे देश तेथील पांढऱ्या आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासांठी प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बजेट मध्ये तोच फील आपल्याच देशात मिळवता येईल अशीही बीचेस आपल्या कोकणात आहेत. त्यात अजूनही कित्येक पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये नसलेले कुडाळ मधील निवती बीचचा समावेश होतो.
या समुद्रकिनाऱ्यावर बसून निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभताना रोजचे ताण तणाव कुठल्याकुठे विरघळून जातात. किनाऱ्यावरची नारळी-पोफळी आणि सुपारीची झाडं दौलत मिरवत उभी आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्त असे सृष्टीतले दोन्ही उत्कट सोहळे अनुभवण्याची उत्तम ठिकाणं म्हणजे निवती समुद्र किनारा. येथे पांढरी रेती आहे. सुमद्राचा तळही दिसेल, इतकं स्वच्छ आणि निळंशार पाणी असा हा समुद्र किनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आणि खाडीच्या अनोख्या संगमातून तयार झालेलं अद्भूत सौंदर्य म्हणजे निवती समुद्र किनारा.
कसे पोहोचायचे:
निवती हे राज्याच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे आणि राष्ट्रीय महामार्गापासून (NH 66) फक्त 20 किमी अंतरावर आहे. कुडाळ येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वरून उतरणे आवश्यक आहे जिथून निवती अंदाजे 20 किमी आहे. मालवण आणि वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या रस्त्यानेही मालवणहून निवतीला जाता येते.
कोल्हापूर ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
कोल्हापूर-गगनबावडा-कणकवली-कुडाळ-निवती
पुणे ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
पुणे – सातारा – उंब्रज (साताऱ्यापासून 35 किमी) – चिपळूण – कणकवली – कुडाळ – निवती
मुंबई ते निवती हा सर्वोत्तम मार्ग
मुंबई-पनवेल-पेण-खेड-चिपळूण-कणकवले-कुडाळ-निवती
Enter map content here..