Indian Railway News:आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते. परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेन जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.
उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशनच्या मदतीने जनरल डब्ब्यामध्ये स्वस्त दरामध्ये जेवण आणि नास्ता दिला जाणार आहे. रेल्वेत परवडणारे जेवण 20 रुपयांत असणार आहे. तसेच 50 रुपयांत जेवण मिळणार आहे.
जेवणात काय काय असणार?
सर्वसामान्य डब्यांजवळ रेल्वे स्थानकावर असलेल्या काउंटरवर हे जेवण मिळणार आहे. त्यात
20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या इकोनॉमी जेवणात सात पुऱ्या (175 ग्रॅम), बटाट्याची भाजी (150 ग्रॅम) आणि लोणचे देणार आहे. तर 50 रुपयांत (कॉम्बो पॅक) मिळणाऱ्या जेवणाच्या पाकिटात राजमा, छोले, भात, खिचडी, पावभाजी, मसाले डोसा दिले जाणार आहे. 350 ग्रॅम हे जेवण असणार आहे. सर्वसाधारण प्रवाशांना परवडणाऱ्या या जेवणाची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे.
Facebook Comments Box