Konkan Railway News: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने TOD (Train on Demand) तत्वावर या कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी या दरम्यान एक एसी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
१) ०१०१७/०१०१८ एलटीटी – थिवी – एलटीटी ट्राय वीकली विशेष.
०१०१७ लोकमान्य टिळक टर्मिनसहून २६.०४.२०२४ ते ०४.०६.२०२४ पर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री २२:१५ ला सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० ला थिवीला पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत.
०१०१८ थिवीहून २७.०४.२०२४ ते ०५.०६.२०२४ पर्यंत प्रत्येक शनिवार, सोमवार आणि बुधवारी संध्याकाळी १६:३५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ ला लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड
डब्यांची सरंचना : १५ एसी थ्री टायर इकॉनॉमी, २ जनरेटर व्हॅन
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून विशेष गाडी; एकूण ३६ फेऱ्या – Kokanai https://t.co/ySt1OVxaAS#konkanrailway pic.twitter.com/YP0mmgIlQS
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) April 25, 2024
![]()
Facebook Comments Box


