कोकण विकास समितीचे रेल्वे अभ्यासक अक्षय मधुकर महापदी यांनी आर टी आय मधून एक माहिती मिळवलेली आहे. या माहितीत भारतीय रेल्वाच्या अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) रेल्वे मार्गाची यादी दिलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत क्षमेतपेक्षा जास्त वापर असेलेल्या कोकण रेल्वेचा समावेश नाही आहे.
आवाज कोकणचा: आपल्या गावाला टंचाई असेल आणि टँकर सुरू करायचा असेल तर आपल्या गावचं नाव टंचाईच्या यादीत असणं गरजेचं असतं. जर हे नाव टंचाईचे यादीत असेल तर आपल्याला शासनाकडून टँकर उपलब्ध केला जातो.
तसेच भारतीय रेल्वेच्या वतीने अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) या दोन याद्यांमध्ये सूचीबद्ध झालेले आहेत. भारतीय रेल्वे या मार्गावर चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अनेक नवनवीन प्रकल्प, दुहेरीकरण, गती-शक्ती सारख्या माध्यमातून क्षमतावृद्धीचे प्रयत्न करत आहे. याकडे रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष असते.पण या यादीमध्ये अतिशय व्यस्त असलेला कोकण रेल्वे मार्ग (एकूण क्षमतेच्या १६८% वापर असूनही) स्थान घेऊ शकला नाही कारण कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये त्याला स्थान नाही.जर या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गाची नोंद झाली तर या ठिकाणी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करून प्रवाशांना वाढीव सोयी सुविधा व गाड्या पुरवल्या जाऊ शकतात.
त्यामुळेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झालेच पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील मार्ग मध्य रेल्वेच्या ताब्यात जायला हवा.
आतापर्यंत कोकणातील खासदारांनी याचा विचार केला नाही पण आता निवडून येणाऱ्या खासदारांनी संसदेत विषय चर्चेत घेऊन लवकरात लवकर मार्गी लावावा.
*HDN and HUN Routes*
As per the Indian Railways classification of the network, a total of 7 High-Density
Network (HDN) routes and 11 Highly Utilised Network (HUN) routes have been
classified based on the passenger and freight volumes carried by these corridors.#konkanrailway pic.twitter.com/yBxQZLCpMh— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) April 28, 2024

श्री. सागर तळवडेकर
सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे अभ्यासक
Facebook Comments Box