रत्नागिरी, दि. ०१ मे: कोकण रेल्वे मागार्वर सोडण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्या ८ ते १० तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खासकरून ०१०१७/०१०१८ एलटीटी थिवी एलटीटी विशेष गाडी पुनर्नियोजित करून सुरवातीपासूनच ८ ते १० तास उशिराने चालविण्यात येत आहे. त्याच बरोबर १००९९/१०१०० एलटीटी मडगाव एलटीटी ही नियमित गाडीही अशीच वारंवार पुनर्नियोजित करून ४ ते ५ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत
काल दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटणारी गाडी क्र. ०१०१७ एलटीटी – थिवी सुमारे सहा तास उशिराने पहाटे ४ वाजून २७ मिनिटांनी रवाना झाली. आधीच उशिरा सुटलेल्या गाडीला प्रथम प्राधान्य देण्याची गरज असताना रेल्वे प्रशासन अगदी या विरुद्ध करून या गाडीला मागे ठेवून इतर गाडयांना प्राधान्य देत असल्याने ही गाडी रत्नागिरीला तब्बल ११ तास उशिरा दुपारी ३:४५ वाजता पोहोचली. याचा अर्थ रात्री १० वाजता आलेला प्रवासी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंत रत्नागिरी स्थानकातच होता. आता मात्र प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी तेथील आरपीएफ कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तिकीट निरीक्षक आणि स्टेशन मास्तर नजरेस ही पडत नसल्याने आपली गाऱ्हाणी कोणासमोर मांडायची असे प्रवासी विचारात होते. या बाबतचा एक विडिओ पण व्हायरल झाला आहे.
विशेष गाड्या जर उशिराने चालवायच्या असतील तर अतिरिक्त भाडे का?
हंगामात रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र या गाड्यांसाठी रेल्वेकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारण्यात येते. उदाहरणार्थ एलटीटी ते सावंतवाडी थ्री टियर इकॉनॉमी कोचच्या सीटचे कोकणकन्या एक्सप्रेसचे भाडे ९६० रुपये एवढे आहे. त्याच अंतरासाठी समान कोचचे ०१०१७/०१०१८ एलटीटी थिवी एलटीटी विशेष गाडीचे भाडे ११६० रुपये आहे. म्हणजे २०० रुपयांचा फरक आहे. एवढे अतिरिक्त भाडे आकारूनही जर अशी सेवा मिळत असल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे.
एलटीटी थिवी एक्सप्रेस रत्नागिरीत ११ तास उशिराने पोहचली; प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत – Kokanai
बातमी 👉🏻https://t.co/Sg3x7CxXL4 pic.twitter.com/OFMznFnhR1
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) May 1, 2024
Facebook Comments Box