मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबईतील हजारो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जातात. त्यामुळे या काळात कोकण रेल्वेचे बुकिंग फुल्ल असते. यंदाचे वर्ष सुरु झाल्यापासून मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग कधी सुरु होणार, याकडे अनेक चाकरमानी डोळे लावून बसले होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून गणेशोत्सवाच्या काळातील गाड्यांचे बुकिंग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा गणरायाचे आगमन ७ सप्टेंबरला होणार आहे. मात्र त्याआधीच चाकरमानी गावी जायला सुरवात करतात.
गणपतीसाठीच्या रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तिकीटं संपतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा बुकिंगला असाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होते. त्याप्रमाणेच यंदा ४ मे पासून तिकीट बुकिंगला सुरुवात होईल.
रेल्वे बुकिंग कॅलेंडर
आरक्षण दिनांक | प्रवास सुरू दिनांक | उत्सव |
शनिवार, दि.04 मे 2024 | रविवार, दि. 01 सप्टेंबर 2024 | – |
रविवार, दि.05 मे 2024 | सोमवार, दि. 02 सप्टेंबर 2024 | – |
सोमवार, दि. 06 मे 2024 | मंगळवार, दि. 03 सप्टेंबर 2024 | – |
मंगळवार, दि. 07 मे 2024 | बुधवार, दि. 04 सप्टेंबर 2024 | – |
बुधवार, दि. 08 मे 2024 | गुरूवार, दि. 05 सप्टेंबर 2024 | – |
गुरूवार, दि. 09 मे 2024 | शुक्रवार, दि. 06 सप्टेंबर 2024 | हरतालिका |
शुक्रवार, दि. 10 मे 2024 | शनिवार, दि. 07 सप्टेंबर 2024 | श्री गणेश चतुर्थी |
शनिवार, दि. 11 मे 2024 | रविवार, दि. 08 सप्टेंबर 2024 | ऋषी पंचमी |
रविवार, दि.12 मे 2024 | सोमवार, दि. 09 सप्टेंबर 2024 | – |
सोमवार, दि.13 मे 2024 | मंगळवार, दि. 10 सप्टेंबर 2024 | गौरी आगमन |
मंगळवार, दि.14 मे 2024 | बुधवार, दि.11 सप्टेंबर 2024 | गौरी पूजन |
बुधवार, दि.15 मे 2024 | गुरूवार, दि.12 सप्टेंबर 2024 | गौरी विसर्जन |
Facebook Comments Box
Vision Abroad