Konkan Railway News :कोकणात दिनांक 07 मे रोजी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे आहे. या गाड्यांच्या दोन्ही बाजूने मिळून एकूण चार फेर्या होणार आहेत. या गाड्यांमुळे कोकणात मतदानासाठी जाणार्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे
1) गाडी क्रमांक 01158/01157 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्र. 01158 मडगाव जं. – पनवेल विशेष ही गाडी दिनांक 06/05/2024, सोमवारी सकाळी 06:00 वाजता मडगाव जंक्शन येथून सुटून त्याच दिवशी संध्याकाळी 18:50 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 01157 पनवेल – मडगाव जं. -पनवेल विशेष दिनांक 08/05/2024, बुधवार रोजी सकाळी 04:00 वाजता पनवेल येथून सुटेल ती मडगाव जंक्शनला त्याच दिवशी संध्याकाळी 17:00 वाजता पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 20 LHB कोच = स्लीपर – 10 कोच, सामान्य – 08, SLR – 02.
2) गाडी क्रमांक 01159/ 01160 पनवेल – सावंतवाडी रोड – पनवेल विशेष :
गाडी क्र. 01159 पनवेल – सावंतवाडी रोड स्पेशल पनवेल येथून सोमवार दिनांक 06/05/2024 रोजी रात्री 20:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:00 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्र. 01160 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून दिनांक 07/05/2024 मंगळवार रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 03:00 वाजता पनवेलला पोहोचेल.
ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.
रचना : एकूण 20 LHB कोच = स्लीपर – 10 कोच, सामान्य – 08, SLR – 02.
वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सोमवारपासून धावणार दोन 'निवडणूक स्पेशल ट्रेन' – Kokanai
सविस्तर वृत्त https://t.co/p4p3VPPOGz#konkanrailway pic.twitter.com/hYSyp2DpO2
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) May 4, 2024
Vision Abroad