मुंबई :उद्या दिनांक ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील भागातील निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने IMD महाराष्ट्रात ज्या भागात मतदान होणार आहे त्या भागातील हवामान अंदाज जाहीर केले आहेत.
IMD ने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, वाडा, सांगली, सातारा आणि हातकंगाले या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस ही पातळी ओलांडणार आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकण भागात तापमान ३४ ते ३६ डिग्री सेल्सिअस च्या घरात राहणार आहे. कोल्हापूर जिल्हय़ात अधिकतम तापमान ३९ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
कोणती काळजी घ्याल?
शक्यतो सकाळी मतदानासाठी बाहेर पडावे. मतदान केंद्रावर गर्दी असल्यास उन्हातही मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडताना हातात छत्री घेऊनच बाहेर पडावे. सोबत पाण्याची मोठी बाटली घेऊन निघा. वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. शक्य असेल तर ORS, लिंबू सरबत अशी घरगुती पेय सोबत घेतल्यास फायद्याचं ठरेल. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर हयगय न करता मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्याकडून मदत मिळवा.
Vision Abroad