Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका विशेष गाडीची वारंवारता Frequency वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 01129 / 01130 लोकमान्य टिळक (टी) – थिविम – लोकमान्य टिळक (टी) त्रि-साप्ताहिक अनारक्षित या गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक (टी) – थिविम (साप्ताहिक) अनारक्षित विशेष जी फक्त शनिवारी चालविण्यात येत होती ती दिनांक13/05/2024 ते 05/06/2024 या कालावधीसाठी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होतील.
गाडी क्र. 01130 थिविम – लोकमान्य टिळक (टी) (साप्ताहिक) अनारक्षित विशेष जी फक्त रविवारी चालविण्यात येत होती ती दिनांक 14/05/2024 ते 06/06/2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि रविवारी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होतील.
Facebook Comments Box
Vision Abroad