10th Result 2024: दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागच्या या वर्षी या परीक्षेचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. मागच्यावर्षी पेक्षा साधारण 1.98 % ने यामध्ये वाढ झाली असली तरीही या निकालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मातृभाषेच्या विषयातच हजारो विद्यार्थ्यांनी गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्यामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
वाचकांच्या प्रतिक्रिया
“एक काळ होता जेव्हा परकीयांची इंग्रजी भाषा दहावी बारावी परीक्षा पास होण्याकरता सर्वात मोठा अडथळा ठरत होती. आता मात्र चित्र उलट दिसत आहे. मराठी भाषा परकी होत चाललेली दिसत आहे.”
श्री. दिगंबर गणपत राणे, माहीम
“राज्य शिक्षण मंडळाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड का जात आहे याबाबत सविस्तर विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल केला गेला पाहिजे.”
सौ. आश्विनी रा. गवस, विरार
Facebook Comments Box
Vision Abroad