Block on Western Railway: मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाने एका पाठोपाठ एक मोठे ब्लॉक घेण्याचा सपाट लावला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ३ दिवसांचा ब्लॉक संपण्याच्या आधीच आता पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी नियोजित देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात असल्याचे जाहीर केले आहे.
रविवार, 2 जून, 2024 रोजी ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर 5 तासांचा मोठा ब्लॉक असेल. याचा परिणाम चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाउन जलद Fast मार्गांवर होईल. जलद मार्गावरील सर्व जलद गाड्या ब्लॉक दरम्यान स्लो मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. तसेच काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील. रद्द केलेल्या गाड्यांची यादी सर्व स्टेशन मास्टर ऑफिसमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्या प्रमाणे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी ...
कोकण
मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरास विधानसभेत अखेर मंजूरी; अशी असतील नवीन नावे.
मुंबई
'नमो भारत रॅपिड रेल्वे'च्या तुलनेत कमी सुविधा असणाऱ्या मुंबई एसी लोकलचे भाडे दुप्पट का? मुंबईकरांचा ...
देश