कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या नवीन गाड्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून दक्षिणेकडील राज्यांसाठी नवीन गाडी चालविण्याची कोकण रेल्वेची तयारी
Railway Updates: कोकण रेल्वेमार्गावर पनवेल – कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने ही गाडी चालवण्याची संमती दिली असल्याची माहिती आहे. मात्र ही सेवा कधी सुरू होणार हे स्पष्ट नाही असा खुलासा मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
सध्या नेत्रावती एक्स्प्रेस ही मुंबईहून केरळला जाणारी एकमेव दैनिक गाडी आहे. कोकण रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या गाड्या दैनिक स्वरूपाच्या नसून आठवड्यातून २ दिवस धावणाऱ्या आहेत. मुंबई-कन्याकुमारी डेली ट्रेन जयंती जनता एक्स्प्रेस चे रूपांतर पुणे-कन्याकुमारी झाल्यामुळे, केरळातील मल्याळीं जनतेने मुंबईसाठीची एक दैनंदिन ट्रेन गमावली आहे.
या स्थितीत मुंबई-केरळ दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेने गेल्या वेळापत्रक समितीच्या बैठकीत केली होती. या बैठकीत दैनिक ट्रेनचे वेळापत्रक काढण्यात अडचणी येत असल्याने दररोजच्या ऐवजी साप्ताहिक सेवेच्या विनंतीवर विचार करण्याचे कोकण रेल्वेने सुचवले होते. त्यानुसार ही गाडी आठवड्यातून एकदाच धावणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे.
ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबईतील इतर ठिकाणाहून सोडावी, अशी शिफारस दक्षिण रेल्वेने केली आहे. तथापि, मध्य रेल्वेने सांगितले की शहरातील सर्व टर्मिनस जास्तीत जास्त क्षमतेने कार्यरत आहेत, त्यामुळे ट्रेन पनवेलहून निघू सोडण्यात येईल. या निर्णयानंतर आता लवकरच पनवेल – कोचुवेली या नवीन साप्ताहिक गाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांची नाराजी.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी वसई- सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी अशा गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन मागण्या केल्या आहेत. मात्र कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने चालत असून या मार्गावर नवीन गाडी चालविणे शक्य नाही हे कारण देऊन या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. मात्र आता दक्षिणेकडील राज्यासाठी नवीन गाडी कशी काय मंजूर केली गेली हा प्रश्न विचारला जात आहे.
![]()
Facebook Comments Box


