रत्नागिरी, आवाज कोकणचा: चिपळूण, खेड, महाड, माणगाव विभागातील प्रवाशांना स्वतंत्र गाडी नसल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी होऊन सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो. तर गावातून मुंबईला येताना आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्यामुळे खेड व त्यापुढील प्रवाशांना गाडीत चढताच येत नाही. काही वेळेस आरक्षण असलेल्या प्रवाशांची गाडीही चुकते. गणेशोत्सवात तर हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दादर व चिपळूण दरम्यान स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी होत आहे. तिकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन केवळ गणेशोत्सव व होळीच्या काळात पनवेलवरून चिपळूण गाडी सोडत आहे. परंतु खेड/चिपळूणचे मुंबईपासूनचे अंतर रत्नागिरी/सावंतवाडीच्या तुलनेत कमी असल्यामुळे व पनवेल किंवा दिव्याला पोहोचणे त्रासदायक असल्यामुळे अति गर्दीचे दिवस वगळता प्रवासी त्या गाडीने प्रवास करण्यास उत्सुक नसतात.
हेच लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडावी अशी मागणी जल फाउंडेशनने रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे व कोंकण रेल्वेकडे केली आहे.
मागील काही वर्षांत खेड, माणगाव, रोहा येथे अति गर्दीमुळे प्रवाशांमध्ये झालेले वाद, गाडीवर दगडफेक यांसारखे प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे जल फौंडेशच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-श्री. अक्षय म्हापदी
रेल्वे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते

![]()
Facebook Comments Box
Related posts:
Accident on South Western Railway : दूधसागर जवळ मालगाडी घसरली; गाडया कोकण रेल्वे मार्गे वळवल्या
कोकण रेल्वे
Konkan Railway: गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न होण्यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डला सुचवल्या ...
कोकण
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आता १२ तास रेल्वे आरक्षण सुविधा मिळणार; प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश
कोकण

