Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणार्या अवजड वाहतुकीच्या वाहनांमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. या अवजड वाहतुकीच्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा मजबूत हाईट खांब उभारले. यामुळे अवजड वाहतुकीच्या खांबांना अखेर ब्रेक लागला आहे.बहुचर्चित कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर केवळ हलक्या वजनांच्या वाहनांकरिता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूकही सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडत होते. अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती.यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी हाईट खांबाचा अवलंब करण्यात आला. मात्र हे हाईट खांब अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसातच उखडले होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखी मजबूत हाईट खांबाची उभारणी करण्याचा निर्णय घेत शुक्रवारपासून प्रत्यक्षात कार्यवाही देखील सुरू केली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास 45 मिनिटांचा कालावधी लागतो आणि त्यात एखादं अवजड वाहनात बिघाड झाल्यास घाटावरती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
Vision Abroad