इंदापूर ते भोगाव (कशेडी) पाहिल्या टप्प्यातील महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला 17 कोटी रुपयांचा निधी वर्ग
Mumbai Goa Highway Updates: जुन्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा मोठी सावली देणारी झाडे होती. नवीन महामार्गाच्या कामासाठी ती झाडे तोडण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूचा भाग उजाड झाला आहे. या भागात या पावसाळ्यापासून झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला काही वर्षानी त्याचे ‘हिरवे’ गतवैभव प्राप्त होणार आहे.
झाडे लावण्यात वन विभागाकडून दिरंगाई?
महामार्ग पूर्ण होत असताना दोन वर्षापूर्वी वन विभागाकडे निधी आला होता. मात्र वनविभागाने तो निधी वापरून झाडे लावण्यात दिरंगाई केली असल्याचा आरोप केला जात आहे. इंदापूर ते भोगाव (कशेडी) पाहिल्या टप्प्यातील महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला 17 कोटी रुपये ईतका निधी दोन वर्षापूर्वीच वर्ग करण्यात आला होता. मात्र तेव्हा झाडे लावली गेली नाहीत. महामार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याने तसेच आलेला निधी टॅप झाला असल्याने झाडे लावण्यात दिरंगाई झाली असल्याचे कारण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. मात्र यावर्षी पावसाळय़ात झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Vision Abroad