Loksabha Election Result 2024: राज्यात जरी मविआ ला भरघोस यश मिळाले असले तरी कोकणात मात्र महायुतीने १००% जागांवर यश मिळवले आहे. ठाणे, कल्याण, रायगड, पालघर आणि रतनागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाचे राज विचारे यांचा पराभव झाला, तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी उमेदवार ठरले. पालघरमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. हेमंत सावरा 184422 मताधिक्याने विजयी ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते (Anant Gite) यांचा 82784 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये देखील ठाकरे गटाला अपयश आलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्धात नारायण राणेंचा 47 हजार 858 मतांनी विजय झाला आहे.
ठाणे, कोकणातील विजयी खासदारांची यादी
ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
पालघर – हेमंत विष्णू सवेरा (भाजप)
रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
रत्नागिरी-सिंधुदर्ग – नारायण राणे (भाजप)
रायगडमध्ये अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगडमध्ये मिळालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांनी राज्यात चार जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’ असं म्हणावं लागेल.
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी
पालघर लोकसभेवर अखेर महायुतीने आपला झेंडा फडकवला असून महायुती भाजपाचे डॉ. हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतं. पालघर लोकसभेवर अखेर पुन्हा एकदा महायुतीने आपलं नाव कोरलं असून भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार मतांनी विजयी झाले असून. या विजयानंतर जिल्ह्यातील प्रश्न आहेत. त्यांना प्राधान्य देण्याचं त्यांनी सांगितलं असून हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले असून त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत यांचा ४७८५८ मतांच्या फरकाने पराभव केला आहे. सावंतवाडी भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या आधी दोनदा खासदार झालेल्या विनायक राऊत यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिवसेनेला असलेली सहानुभूती, जातीय ध्रुवीकरणाची शक्यता, रत्नागिरीत असलेले संघटनात्मक बळ याच्या जोरावर लढणाऱ्या राऊत यांचे बळ भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीसमोर कमजोर पडले. शिवसेनेतील फुटीनंतर मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे शिवसेनेत आले. साहजिकच त्यांच्या अनुक्रमे सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे बळ कमी झाले. त्या दोघांनी राणेंसाठी ताकद लावली..
Facebook Comments Box
Vision Abroad