सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत कोकणात १००% यश मिळवलेल्या महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तर आमदार नितेश राणे यांनी भर पत्रकार परिषदेत राजापूर मतदार संघावर भाजप पक्षातर्फे दावा केला आहे.
निलेश राणेंचे रत्नागिरी मतदारसंघाबाबत ट्वीट
निलेश राणे ट्वीटमध्ये लिहितात, नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार
मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते उच्चशिक्षण मंत्री होती. तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत आत्तापर्यंत 4 वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली तर दोन वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत.
तर लोकसभा निवडणुकीत भाजपला राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात दोन नंबरची मते मिळाली आहेत. फक्त 21 हजार मतांनी भाजपा पिछाडीवर आहे. 2019 च्या तुलनेत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात भाजपा ने चांगला लोकाश्रय मिळवला आहे. हे भाजपसाठी सुचिन्ह असुन येत्या विधानसभेला राजापूर विधानसभेवर भाजपाचा दावा असणार असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना निलेश राणे आणि नितेश राणे यांनी असे ठोकल्याने महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad