दिल्ली: कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
दिल्लीतून कराड, नारायण राणे यांना फोन
मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे शूक्ष्म व लघु उद्योगमंत्री होते. तर भागवत कराड हे राज्य अर्थमंत्री होते. खरं म्हणजे नारायण राणे यांना यावेळीदेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण ते कोकणातील एक मोठा चेहरा आहेत. दुसरीडे भागवत कराड हेदखील मराठवाड्यातील मोठे नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र आता मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय. तसा फोनदेखील भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाकडून कराड आणि नारायण राणे यांना गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुले आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
वेगळी महत्वाची जबाबदारी दिली जाणार?
भाजपचे सरकार आल्यावर नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविण्यात येत होती. मात्र भाजपने नारायण राणे यांना मंत्रीपद देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नारायण राणे यांचे राज्यातील खासकरून कोकण भागातील राजकीय वजन पाहता त्यांना दुसरी महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे.
Facebook Comments Box