न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत चालू असलेल्या यंदाच्या टी20 वर्ल्डकप मध्ये न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची ( New York Nassau County stadium ) खूप चर्चा झाली. या स्टेडियमवरील खेळपट्टी चर्चेत राहिली. या मैदानावर लो स्कोअरिंग मॅचेस झाल्या. गोलंदाजांना या मौदानावर फायदा मिळाला.हे मैदान अस्थायी स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. भारत आणि अमेरिका यांच्यातील मॅचनंतर मैदानाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे.
न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम अवघ्या पाच महिन्यांत बांधले गेले. हे स्टेडियम केवळ टी-२० विश्वचषकातील सामन्यांसाठी बांधण्यात आले होते. अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ICC ने टी-२० विश्वचषक सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय डॅलस (टेक्सास) आणि फ्लोरिडा या ठिकाणांचीही स्पर्धेतील सामन्यांसाठी निवड करण्यात आली. नासाऊ काउंटी स्टेडियम तयार करण्याबाबत अंतिम निर्णय सप्टेंबर २०२३ मध्ये झाला.
न्यूयॉर्कमधील या मैदानाच्या उभारणीचा खर्च 30 मिलियन डॉलर होता. या मैदानाची निर्मिती 8 महिन्यात करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड ओवल स्टेडियमवरुन विशेष माती मागवण्यात आली होती. हे स्टेडियम पुढील 6 आठवड्यात पूर्णपणे हटवण्यात येईल.
बुधवारपासून स्टेडियम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्कमधील आयजनहावर पार्कमध्ये बांधण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये या मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. या पार्कमधून नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिमय गायब होईल.
नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आठ मॅच खेळवण्यात आल्या. इथं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तीन संघानं विजय मिळवला. तर, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं पाचवेळा विजय मिळवला. भारतानं दोन वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक 137 धावा केल्या होत्या. कॅनडानं ती मॅच 12 धावांनी जिंकली होती.